सेलिब्रिटींची लोकप्रियता त्यांच्या मृत्यूनंतरही कमी होत नाही. अशीच काहीशी बाब समोर आली आहे. मृत्यूनंतरही दरमहा कोट्यवधी कमावणा-या सेलिब्रिटींची यादीच समोर आली आहे. यांत बड्या बड्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. फोर्ब्सनं ही यादी जाहिर केली आहे. या यादीत पॉप स्टार मायकेल जॅक्सन अव्वल स्थानावर आहे. किंग ऑफ पॉप नावाने प्रसिद्ध असलेल्या मायकेलची लोकप्रियता त्याच्या मृत्यूनंतरही घटलेली नाही. 2009 साली ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मायकेलचा मृत्यू झाल्यानंतरही तो कोट्यवधीची कमाई करतो आहे. मायकेल दरवर्षी 48 कोटी रुपये कमावत आहे. आजही, त्याच्या संगीत कंपनीत त्याची भागीदारी आहे आणि त्याच्या संगीताची रॉयल्टी वेगळी आहे. या कमाईत सोनी/ए टीव्ही म्युझिक पब्लिशिंग कॅटलॉगमध्ये मायकल जॅक्सनच्या नावे शेअर विकून होणा-या उत्पन्नाचाही समावेश आहे.गेल्या वर्षाच्या अखेरीस मायकेलची कमाई साडेचारशे कोटी इतकी होती. केवळ २०१२ या वर्षाचा अपवाद वगळता मृत सेलिब्रिटींच्या कमाईच्या यादीत तो सर्वोच्च स्थानावर आहे. या यादीत अलबर्ट आइन्स्टाईन यांचं नावही आहे. ते अजूनही दरवर्षी 6 कोटी रुपयांची कमाई करतात. 62 वर्षांपूर्वी अलबर्ट आईन्स्टाईन यांचं निधन झालंय. मात्र विज्ञानाच्या अनेक सिद्धांताचे परवाने आइन्स्टाईन यांच्या नावावर आहेत. त्याची रॉयल्टी त्यांना आजही मिळते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews